डाळिंबाच्या ही साल आहे. ही साल फार औषधी असते. रक्तशुद्धीसाठी याचा उत्तम उपयोग होतो. त्याचप्रमाणे ही साल अतिशय शीतल गुणाची आहे. ह्या दोन्ही गुणांचा फायदा बाळाला होतो. उष्णतेमुळे तसेच रक्तातील काही दोषांमुळे अंगावर पुटकुळ्या वगैरे उठतात. ह्या पुटकुळ्या किंवा पुरील बऱ्या करण्यासाठी ह्या सालीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे हा असा त्रास होऊ नये, म्हणूनही ही साल वापरली जाते. ह्या सालीमध्येही कृमिनाश करण्याचा गुण आहे. ह्या सर्व गुणांबरोबरच हृदयाची ताकद वाढविणारे हे औषध आहे. हृदयाच्या स्नायूंना शक्ती देणारे तसेच हृदयाच्या कार्यामध्ये मदत करणारे हे औषध आहे. हा ह्याचा फार मोठा उपयोग मानला जातो. फ्लैवेनॉइन आणि फेनॉलिक्स डाळींबाच्या पेक्षा जास्त साली मध्ये असते. डाळींबाच्या दाण्यामध्ये जेवढे विटामिन सी असते तेवढेच साली मध्ये असते