हळदीचे पिवळे जाड कंद असतात. मूल लहान असताना हळद देणे श्रेयस्कर आहे. त्याने दुधाची शुद्धी होते व ते पचण्यास सोपे जाते. ते दुधामुळे कफ वाढू देत नाही. हळद जंतुनाशक (Antiseptic) आहे. रक्तशद्धीकर असल्यामळे अंगाची खाज कमी होते. हळदीने कांती सुधारते, "पी हळद आणि हो गोरी'' असे गंमतीने म्हणतातच. चिकटपणा कमी करण्याचा गुणधर्म असल्यामुळे नाकातून शेंबूड येणे, घशातून खाकरा येणे यात ती विशेष उपयोगी आहे. सर्व दुखण्यात हळद वेदना कमी करते व अशक्तपणाही भरून निघतो. कंद पिठूळ असल्यामुळे त्यांना लवकर कीड लागते, म्हणून अधूनमधून उन्हात खडखडीत वाळवावेत.