शतावरी Shatavari हे ही एक बहुगुणी औषध आहे. मुख्यतः हे ताकद वाढविणारे तसेच पोटातील अग्नी प्रज्वलित करणारे औषध आहे. त्याचप्रमाणे लघवीची दुखणी बरी करण्याचा गुणही यामध्ये आहे. बऱ्याच वेळा बाळाला लघवी होत नाही. लघवी न झाल्याने बाळ रडू लागते. हे असे होऊ नये, म्हणून शतावरीचा उपयोग उत्तम होतो. ह्या लघवीप्रमाणेच बाळाला बऱ्याच वेळा आढळणारे दुखणे म्हणजे अपस्मार. अपस्मार म्हणजे फीटस् किंवा आकडी येणे. नाना प्रकारच्या कारणांनी बाळाला हे दुखणे होऊ शकते. हा त्रास होऊ नये, म्हणून शतावरी हे औषध फार गुणकारी आहे. हे औषध थोडेसे कडू असल्याने ते साखरेबरोबर दिले जाते.