गंमत म्हणजे ही काही वनस्पती नाही. काही किडे विशिष्ट झाडांचा रस शोषून घेऊन त्यावर फळासारखे दिसणारे घरटे तयार करतात. हेच ते मायफळ. चांगले मायफळ गोल, हिरवट पिवळ्या रंगाचे असते. त्यावर पुळ्या असून भोके असतात. तुरट रसाचे प्राधान्य असल्याने त्याचा स्तंभक असा गुण असतो. उलट्या, जुलाब, वहाणारे नाक, भरपूर कफ पडतो अशा वेळेस मायफळाने ते आळते.