जायफळ हे खरं म्हणजे फळ नसून बी आहे. ते सुपारीप्रमाणे दिसते पण सुगंधी असते. डहाळ लागली असता पाण्यासारखे जुलाब होतात व सारखे होतात, थांबतच नाहीत, तेव्हा जायफळाने विशेष गुण येतो. त्याने शौचाचा दुर्गंधही कमी होतो. जास्त मात्रेत ते चढते (सुस्ती येते) व ऊष्णही पडते, म्हणून कमीच द्यावे. सायनस पोकळ्यात सर्दी वारंवार साचत असल्यास जायफळ पाण्यात उगाळून कपाळाला त्याचे गंध लावतात. जुलाब फार होत असताना (अतिसार) बेंबीवर जायफळाचा लेप लावतात.