बदाम हे लंबगोल आकाराचे रेषांची नक्षी असलेले बदामी रंगाचे बी तील फळ आहे.
हे चांगले टॉनिक आहे. बदामात असते जीवनसत्व अ व ई. ते त्वचेची कांती सुधारायला चांगले. बदाम हे बुद्धीवर्धकही समजले जातात. ते शक्तिवर्धकही आहेत. . बदाम हे ताकद वाढविणारे म्हणून वापरले जाते. ते चवीला गोड असते आणि त्याच्यात तेल असते. शरीरात स्निग्धता निर्माण करण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. बदाम पौष्टिक, धातू सकस बनवणारा तसेच मेंदूला व बुद्धीला हितकर असल्याने आठ-दहा तास भिजवून सोललेला बदाम गुटीसह देणे चांगले असते. दोन महिन्यांपर्यंत पाव बदाम, सहा महिन्यांपर्यंत अर्धा, सहा महिने ते वर्षापर्यंत पाऊण बदाम व नंतर रोज एक बदाम उगाळून द्यावा. मूल दोन वर्षांचे झाले की दोन बदाम द्यायला सुरुवात करावी. पुढे मूल जसजसे मोठे होईल तसतसे हळूहळू तीन-चार बदाम द्यावेत .