मुरुडशेंग ही एका झाडाची शेंग असते. ही शेंग तुरट असते. ही शीतल असते. म्हणजे हिच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते. वात, पित्त आणि कफ ह्या तिन्ही दोषांसाठी हिचा उपयोगहोतो. ही शेंगसुद्धा कृमिघ्न आहे. लहान मुलांच्या पोटात कधी कधी मुरडा होऊन मूल जोराने रडू लागते. पोटाचे स्नायू आक्रसून कळा येतात. ह्या दुखण्यावर मुरुडशेंगेचा उपयोग होतो. ह्या सर्व औषधी गुणधर्मांचा विचार करून मुरुडशेंग बाळगुटीच्या औषधात वापरण्यात येते.