डिकेमाली हा त्या झाडाचा वाळलेला डिंक आहे. त्याचा रंग पिवळसर सोनेरी असतो. त्याला हिंगाप्रमाणे उग्र दर्प येतो.मुलांना दात येत असताना होणाऱ्या उलट्या, जुलाब, ताप, जंत, अपचन, पोटात वायु धरणे या सर्वांवर हे छान औषध आहे. मुलांचे दात येत असताना होणारी शिवशिव डिकेमाली हिरड्यांना मधातून घासल्याने कमी होते. हिरड्यांना बळकटी येते. डिकेमाली लवकर विरघळत नाही. त्यामुळे माती खाणाऱ्या मुलांच्या हातात याचा खडा देतात. शिवाय दुर्गंध व विचित्र चवीमुळेही ही सवय सुटते. धोका तर काहीच नाही.