वेखंडाचे बोटासारखे कंद उग्र सुगंधी असतात. त्यावर गाठी असतात. वेखंड उत्तेजक आहे. त्याने तरतरी येते. संस्कृत नाव वचा म्हणजे वाचाशक्ती सुधारणारे. बाळ लवकर व निर्दोष बोलु लागण्यास व उत्साही होण्यास वेखंडाचा उपयोग होतो. वेखंडाने कफ सुटून आवाज सुधारतो, घशातील व श्वसननलिकेतील सूज व जंतूसंसर्ग कमी होतो. तापातही उपयोगी पडते. आंघोळीनंतर वेखंडाची पूड बाळाच्या अंगाला पावडर प्रमाणे लावतात. त्याने कफ, सर्दी होत नाही, जंतु संसर्ग होत नाही आणि इडापिडाही टळते असा समज आहे.