हिरडा बाळाची आई प्रमाणे काळजी घेतो. असे आयुर्वेदातील श्लोक सांगतात. हिरड्याची फळे लांबट गोल, कठीण असतात, त्यावर पाच किंवा अधिक कडा असतात. फळात बी तयार होण्याआधी काढलेला तो बाळहिरडा हा काळ्या रंगाचा, छोटा असतो. तर तयार हिरडा हा पिवळसर तपकिरी रंगाचा, वजनदार असतो.