बाळाच्या पोटात जे अन्न जाते ते पचून उरलेले मलरूपाने बाहेर पडले पाहिजे. पोट साफ न झाल्यास न पचलेले अन्न तसेच पडून राहन अजीर्ण होते, मग भूक लागत नाही, कृमी होतात. हिरड्याने शौचास साफ होते, मग भूक लागणे, अन्न पचणे ही क्रिया आपोआपच सुधारते. बाळहिरड्याने मल शुद्धी होते तर हिरड्याने पोट साफ होते. दोन्हीही घ्यावेत. थोडक्यात हिरड्या पेक्षा बाळहिरडा सौम्य रेचक आहे. पोट साफ झाले की रेच आपोआपच थांबतात.