ज्येष्ठमध याचं संस्कृत नाव आहे यष्टीमधु. यष्टी म्हणजे काठीचा तुकडा, मधु म्हणजे गोड. ज्येष्ठमधाचे मूळ जाड, भरीव असल्याचे पाहून घ्यावे. ज्येष्ठमध गुटीला गोडी आणते, गुटीची औषधे रूक्ष व ऊष्ण पडू देत नाही. ते वंगणाप्रमाणे कार्य करून जास्तीचा कफ बाहेर काढते. स्वर, कांती, दृष्टी सुधारणारे ते टॉनिक आहे. शौचाला व लघवीला साफ होण्यासही मदत करते..