अतिविष ह्याच्या नावावरून गैरसमज होतात. विषाचा आणि त्याचा काही संबंध नाही. अपचनामुळे उलटी होणे, पोटात दुखणे,आतड्याला सूज येणे इत्यादींसाठी त्याचा उपयोग होतो. अग्नि प्रदीप्त करणे आणि पचनाला मदत करणे हे कार्यही अतिविष करते. त्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे विषमज्वराचा नाश करणे, हा आहे. ह्या विषमज्वराचा त्रास लहान बाळाला होण्याचा संभव असतो. तो त्रास होऊ नये, म्हणून ह्या औषधाचा उपयोग बाळगुटीमध्ये केला गेला आहे.