बेहड्याचे फळ गोल, देठ असलेले असते. बी वापरू नये. फळाची साल वापरावी. ती लगेच मऊ पडते व बुरशी येते. दर वेळेस खडखडीत वाळवावी. बेहड्याचे संस्कृत नावच आहे 'बिभितक'. म्हणजे 'ज्याच्या सेवनाने रोगभय जाते'. चिकटा नाहिसा करणे असा याचा मुख्य गुणधर्म आहे. कोरडा खोकला, खवखवणारा, लाल घसा, आवाज बसणे, पडजीभ वाढणे, ठसका, सर्दी, पडसे या सर्वांवर उपयोगी पडतो.