अश्वगंधाच्या पांढुरक्या रंगाच्या, करंगळी एवढ्या, पिठुळ मुळ्या असतात. त्यांना घोड्यासारखा वास येतो. म्हणून संस्कृत नाव अश्वगंधा. त्याच्या सेवनाने शक्ती व उत्साहही तसाच येतो. 'रसायन' म्हणजे शरिरातील सर्व धातूंचे पोषण करणे असा याचा प्रमुख गुणधर्म. लहान मुलांना बाळसे येण्यास हे विशेष उपयोगी आहे. हाडांच्या व वातवाहिन्यांच्या बळकटीसाठी पर्वी गटीमध्ये कासवाची पाठ वापरत त्याला हा समर्थ पर्याय आहे. बाळंतपणानंतरची कंबरदुखी बंद होण्यास अश्वगंधा चूर्ण दूधसाखरेतून घेतात.